नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहलं आहे. दिल्लीतील मद्य उत्पादन शुल्क धोरणावरुन अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. १० वर्षापूर्वीच्या एका बैठकीचा दाखल या पत्राच्या माध्यमातून अण्णा हजारेंनी केजरीवालांना दिला आहे. मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारेंनी केजरीवालांना लगावला आहे. त्यावर आता अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी मद्य धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप केला. सीबीआयनं सुद्धा घोटाळा झाला नसल्याचं सांगितलं आहे. जनता देखील त्यांचं ऐकत नाही. आता ते अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहे. राजकारणात हे सर्वसाधरण असते.”

aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
udayanraje bhosale marathi news, narendra patil marathi news, udayanraje amit shah meeting latest marathi news
उदयनराजे यांना तीन दिवस भेट मिळत नाही याचं वाईट वाटतं – माथाडी नेते नरेंद्र पाटील

“सिसोदियांना एकप्रकारे क्लीनचीटच मिळाली…”

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले होते. त्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. मात्र, त्यांच्या या हिंमतीचे अरविंद केजरीवाल यांनी कौतुक केलं आहे. “जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात येतो, तेव्हा कोणत्याही तपासासाठी तयार असलं पाहिजे. मनीष सिसोदियांची सीबीआयने १४ तास चौकशी केली. सीबीआयच्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले. तसेच, तपासादरम्यान, सीबीआयला सिसोदियांच्या घरातील लॉकरमध्ये काहीही सापडले नाही. त्यामुळे ही एकपद्धतीने क्लीन चिटच मिळाली आहे,” असेही केजरीवाल यांनी म्हटलं.

अण्णा हजारेंच्या पत्रात काय?

‘‘दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती’’, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून खडसावले होते.

“मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारे यांनी केजरीवाल यांना लगावला आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अनेक वेळा राळेगण सिद्धी येथे आला होतात. त्या वेळी तुम्ही राळेगण सिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले होते. मात्र सत्तेत आल्यावर मात्र तुम्ही या गोष्टी विसरलात याची खंत वाटते,” असेही अण्णा हजारेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.