तमिळनाडू्चे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांच्या कामाची देशभरात चर्चा होत आहे. यातच आता विजय यांनी आणखी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. तमिळनाडू्मधील प्रत्येक विद्यमान आमदारांना नवीन कार आणि चालकासाठी ७५ हजार रुपयांचा भत्ता देण्यात येणार आहे. जोसेफ विजय यांच्या या निर्णयाची देशभरात चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री विजय यांनी सांगितलं की, तमिळनाडू्मधील सर्व विद्यमान आमदारांना आता नवीन गाड्या दिल्या जातील. जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करणं आणि लोकांच्या समस्या सोडवणं जास्त सोप्प होईल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांना नियमितपणे त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करावा लागतो. त्यामुळे या प्रवासासाठी सरकार सर्व आमदारांना गाड्या उपलब्ध करून देईल, अशी माहिती मुख्यमंत्री विजय यांनी दिली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

आमदारांना कार आणि चालकांचे वेतन व गाडीशी संबंधित खर्चासाठी दरमहा ७५ हजार रुपयांचा भत्ता देखील सरकारकडून दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक आमदाराच्या कार्यालयात सहाय्यक नेमण्यासाठी सरकार दरमहा २५ हजार रुपये देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री विजय यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना अधिकृत वाहने दिले जातात. या मुद्यांकडे काही आमदारांनी सरकारचं लक्ष वेधलं होतं. नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना म्हणजे महापौर आणि उपमहापौर यांना सरकार वाहने पुरवतं. मग हीच सुविधा आमदारांना का मिळत नाही? असा सवाल आमदारांनी केला होता. आमदारांच्या म्हणण्यांनुसार, अधिकृत वाहने नसल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या प्रवासांवर विशेषतः महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे ही मागणी आमदारांनी सभागृहात मांडली होती. या मागणीनंतर मुख्यमंत्री विजय यांनी हा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी ३५१ कोटी रुपये

याव्यतिरिक्त सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची क्षमता वाढवण्यासाठी तमिळनाडू् सरकारने ३५१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील एकूण ६ हजार ०९८ अतिरिक्त जागा निर्माण करण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. तमिळनाडू् सरकार सात नवीन सरकारी नर्सिंग महाविद्यालयेही स्थापन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य विमा संरक्षणात वाढ

दरम्यान, मुख्यमंत्री आरोग्य विमा योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांसाठी वार्षिक मर्यादा आधी ५ लाख रुपये होती. मात्र, आता ही मर्यादा २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय तमिळनाडू् सरकारने घेतला आहे.