रुपयाच्या सातत्याने सुरु असलेल्या घसरणीचा इंधनाच्या दरावर मोठा परिणाम होत आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरात येत्या ऑक्टोंबरपासून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किंमतींमुळे सर्वसामान्य आधीच त्रस्त असताना आता नैसर्गिक वायूच्या किंमतीही भडकल्या तर महागाईमध्ये आणखी भर पडेल. सीएनजी गॅसचा गाडीमध्ये इंधन म्हणून वापर केला जाते.

देशातंर्गत नैसर्गिक वायूंच्या दरांचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात येतो. आता एक ऑक्टोंबरला या दराचा आढावा घेण्यात येईल. देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या बेस प्राईजमध्ये १४ टक्के म्हणजे प्रति युनिट ३.५ डॉलरने वाढ होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी मार्च २०१६ च्या अखेरीस प्रति युनिट ३.८२ डॉलर सर्वाधिक दर होता.

अमेरिका, कॅनडा, यूके आणि रशियामधील नैसर्गिक वायूंच्या किंमतीचा आढावा घेऊन दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यात येतात. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या दरावरही होणार.