कोळखा खाणवाटप खटलाची चौकशी करणाऱ्या विशेष न्यायालयाने चौकशी अधिकाऱ्यांच्या विरोधात वैयक्तिक टिप्पणी करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कायदेशीर बाबी तपासून भाष्य करावे असा सल्लाही दिला.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली होती त्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर न्यायमूर्ती एम.बी. लोकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक निर्भय कुमार व निरीक्षक राजबिर सिंह यांना या प्रकरणी तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीतून बाहेर पडता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले तसेच अधिकाऱ्यांवरील टिप्पणीबाबत नाराजी व्यक्त केली.