कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वडिलांचा मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी बंगाल पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. शेख अब्दुल हाफिज हा सीजेपीचा कार्यकर्ता आहे. समर्थक अब्दुल हाफिजचे वडील जनाब माफीक यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात जनाब माफीक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अब्दुल हाफिज यांच्या वडिलांची मारहाणीतून हत्या
स्वयंसेवक शेख अब्दुल हाफिज हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाशी जोडले गेले आहेत. दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात ही अब्दुल हाफीज होते. त्यांच्या वडिलांवर हल्ला करण्यात आला. अब्दुल हाफिज एवढीच मागणी करत होते की पश्चिम बंगालच्या आमच्या जिल्ह्यात सरकारी शाळांची अवस्था सुधारा हीच मागणी केली होती. मात्र अब्दुल हाफिज आणि जनाब माफिक यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात जनाब माफिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे बंगाल पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी केली आठजणांना अटक
१३ ऑगस्टला अब्दुल हाफिज हे स्कूल ठिक करो या CJP च्या आंदोलनाच्या अंतर्गत आवाज उठवत होते. मात्र त्याच रात्री त्यांना आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. या घटनेत अब्दुल हाफिज यांचे वडील शेख मोहम्मद माफिक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माफिक ज्या भागात राहात होते तिथे तणाव वाढला. त्यांची पत्नी हसीना बेगम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात आठजणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मारहाणीचा आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
