राजस्थानच्या करौली शहरातील एसबीआय(SBI) शाखेतून ११ कोटी किमतीची नाणी गहाळ झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषन विभागाकडून(CBI) देशातील २५ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. दिल्ली, जयपूर, दौसा, करौली, सवाई माधोपूर, अल्वर, उदयपूर आणि भिलवाडासह इतर ठिकाणी १५ माजी बँक अधिकाऱ्यांशी संबंधित परिसरांमध्ये गुरुवारी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Gold-Silver Price on 20 August 2022: सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या, किती रुपयांनी कमी झाली किंमत

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने याप्रकरणी १३ एप्रिलला गुन्हा दाखल केला होता. करौलीच्या एसबीआय शाखेमध्ये रोख राखीव रकमेमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये तफावत आढळून आली होती. त्यानंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत तब्बल ११ कोटी नाणी गायब असल्याचे उघडकीस आले होते.

VIRAL VIDEO : बॅटरी काढायला गेला अन् हातातच अगदी बॉम्बसारखा फुटला मोबाईल, घटना कॅमेऱ्यात कैद

एका खाजगी संस्थेकडून करौली बँकेतील पैशांची मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे दोन कोटी किमतीच्या तीन हजार नाण्यांच्या पिशव्या आरबीआयच्या(RBI) नाणे विभागात हस्तांतरीत करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याप्रकरणी सध्या सीबीआयकडून कसून तपास सुरू असून ११ कोटींच्या नाण्यांचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coin worth 11 crore missing from sbi karauli bank rajasthan cbi carried raid rvs
First published on: 20-08-2022 at 10:51 IST