मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात थंडला येथे सोमवारी एका सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात तब्बल २९६ जोडपी विवाहबंधनात अडकली. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेअंतर्गत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या सार्वजनिक विवाह सोहळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्समधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी थंडला येथे एका सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल २९६ जोडप्यांचा विवाह झाला. योजनेंतर्गत नवविवाहित जोडप्यांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ही पाकिटे मेक-अप बॉक्समध्ये सापडली आहेत, जी योजनेचा भाग म्हणून जोडप्यांना देण्यात आली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हा प्रकार उजेडात आल्यानंतर वरिष्ठ जिल्हा अधिकारी भुरसिंग रावत यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे बोट दाखवलं आहे. “कुटुंब नियोजनाशी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी कंडोम आणि गर्भनिरोधकांचे वाटप केले असावे”, असं त्यांचं म्हणणं आहे.

“कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांप्रकरणी आम्ही जबाबदार नाही. आरोग्य विभागाने हे साहित्य त्यांच्या कुटुंब नियोजन जागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून दिले असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेंतर्गत, आम्ही थेट ४९ हजार रुपये नववधूच्या बँक खात्यात जमा करतो. तसंच, अन्न, पाणी आणि तंबू पुरवण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु, पॅकेटमधून वाटल्या गेलेल्या साहित्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती”, असंही रावत यानी पुढे स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री कन्या विवाह योजना काय आहे?

मध्य प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्याकरता एप्रिल २००६ मध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, सरकार वधूच्या कुटुंबाला ५५ हजार रुपये दिले जातात. त्यापैकी ४९ हजार बँकेत जमा केले जातात तर, ६ हजार रुपये विवाहासाठी वापरले जातात.

गेल्या महिन्यातही घडला होता प्रकार

दिंडोरीतील गडसराय भागात गेल्या महिन्यात याच योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात वधूंना गर्भधारणा चाचणी करायला लावली होती. त्यावेळी याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. या चाचणीत एक महिला गरोदर असल्याचे समोर आले होते. लग्नाआधीपासूनच ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत राहत असल्याचं तिने त्यावेळी स्पष्ट केलं होतं. वधू-वरांचे वय तपासण्यासाठी, सिकलसेल अॅनिमिया तपासण्यासाठी आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत की नाही हे पाहण्यासाठी अशा चाचण्या केल्या जातात अशी माहिती दिंडोरीचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती.

Story img Loader