पूर्व काँगोमध्ये इबोला विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. याबरोबरच सरकारच्या विलंबाने झालेल्या प्रतिसादाबाबतचे तपशीलही समोर आले आहेत.
प्रभावित भागांमध्ये ५१३ संशयित रुग्ण आणि १३१ मृत्यूंची नोंद झाली आहे.
हे संशयित मृत्यू आहेत आणि यातील नेमके किती मृत्यू या आजारामुळे झाले आहेत, हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री सॅम्युअल रॉजर कांबा यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी या इबोला उद्रेकाला ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे.
आरोग्य अधिकार्यांच्या मते, गेल्या शुक्रवारी पहिल्यांदा पुष्टी झालेला हा चालू उद्रेक बुंदिबुग्यो विषाणूमुळे मुळे झाला आहे. हा इबोला आजाराचा एक दुर्मिळ प्रकार असून यावर अद्याप कोणतेही मंजूर उपचार किंवा लस उपलब्ध नाही. काँगो आणि युगांडामध्ये आतापर्यंत इबोलाचे २० पेक्षा जास्त उद्रेक झाले असले, तरी बुंदिबुग्यो विषाणू आढळण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे.
बाधित क्षेत्रे काँगोच्या काही भागांमध्ये हे रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे. बुनिया, उत्तर किवूची बंडखोरांच्या ताब्यातील राजधानी गोमा, मोंगब्वालू, बुटेम्बो, नायकुंडे येथे इबोला रुग्ण असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.या महामारीचा वाढता टप्पा आणि वेग पाहून आम्ही अत्यंत चिंतेत आहोत. या संदर्भात पुढील शिफारसींवर सल्ला देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची आरोग्य संस्था मंगळवारीच आपल्या आणीबाणी समितीची बैठक बोलावणार आहे.- टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना
