जाहीरनाम्यात आश्वासन नसल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप केले जाईल. महिलांची मंगळसूत्रे हिसकावून घेतली जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांमुळे सोमवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू वा मुस्लीम हे शब्ददेखील नसल्याचे सांगत लोकांमध्ये भीती पसरवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न मोदी व भाजप करत असल्याची टीका पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली.

हेही वाचा >>> “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंची आक्रमक भाषेत टीका, “दिला नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, ही मोदींची अवस्था”
BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
ajit pawar sharad pawar (4)
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत रविवारी मोदींनी घणाघाती आरोप केले. संपत्तीचे फेरवाटप करण्याचे आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या २००६ मधील राष्ट्रीय विकास परिषदेतील भाषणाचा आधार घेत काँग्रेसवर मुस्लीम अनुनयाचाही आरोप मोदी यांनी केला. त्यानंतर सोमवारी काँग्रेसने पंतप्रधान व भाजपवर चौफेर हल्ला चढविला. लोकसभा निवडणुकीत धर्माच्या आधारे दुही निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला असून त्यांच्याविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयोगाची भेट घेऊन अधिकृत तक्रार नोंदवली. या वादावर आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. काँग्रेसने भाजपविरोधात आतापर्यंत १७ तक्रारी केल्या आहेत.

भाजपचा ध्रुवीकरणावर भर?

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी होणार असून त्यापूर्वी भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. यावेळी रविवारच्या राजस्थानमधील प्रचारसभेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम मुद्दा ऐरणीवर आणला.

जाहीरनाम्यात संपत्तीचे फेरवाटपनाही!

काँग्रेसच्या ४५ पानांच्या जाहीरनाम्यामध्ये ‘संपत्तीच्या फेरवाटपा’चा उल्लेख नाही. पान क्रमांक-६ वर ‘सामाजिक न्याय’ या विभागात जातनिहाय जनगणना केल्यानंतर विकासामध्ये अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींच्या विकासासाठी रचनात्मक (अ‍ॅफरमेटिव्ह) प्रयत्न केला जाईल. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकली जाईल. यासह ७ व्या क्रमांकावर ‘सरकारी जमीन व अतिरिक्त जमिनीचे गरिबांना वाटप केले जाईल’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

मनमोहन सिंग नेमके काय म्हणाले होते?

* अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला व मुले यांच्या उन्नतीसाठी कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी योजना राबवाव्या लागतील.

* अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लीम अल्पसंख्याकांपर्यंत विकासाची फळे न्याय्यरीतीने पोहोचली पाहिजेत. देशातील संसाधनांवर त्यांचा पहिला हक्क असायला हवा!..

* २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या या भाषणावरून वाद झाला होता. त्यानंतर संसाधनांवरील हक्क मुस्लीम नव्हे तर अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींचा असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या कार्यालयाने दिले होते.

मोदींचे विधान असत्य – डॉ. मुणगेकर

मुंबई : देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंग यांचा हवाला देत पंतप्रधानांनी केलेले विधान असत्य आहे, असा दावा काँग्रेस नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा डाव असल्याचाही त्यांचा आरोप आहे.

मोदी नेमके काय म्हणाले?

* काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल, माता-भगिनींच्या सोन्याचे मोजमाप केले जाईल आणि नंतर त्याचे फेरवाटप केले जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस तुमचे मंगळसूत्रही सोडणार नाही. काँग्रेस आता शहरी नक्षलीच्या पूर्णपणे ताब्यात गेला आहे.

*सरकारला तुमचीसंपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे का? सोने स्त्रियांच्या स्वाभिमानाशी जोडलेले आहे. तिचे मंगळसूत्र तिच्या स्वप्नांशी जोडलेले आहे. तुम्हाला ते हिसकावून घ्यायचे आहे का?

* काँग्रेस तुमची संपत्ती गोळा करेल आणि ज्यांना जास्त मुले आहेत अशा लोकांमध्ये, घुसखोरांमध्ये वाटेल. तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा घुसखोरांना (मुस्लीम) दिला जाईल. काँग्रेसचा जाहीरनामाच असे सांगतो.

* मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील निराशेनंतर मोदींच्या खोटेपणाची पातळी इतकी घसरली आहे की, भीतीपोटी ते आता जनतेचे लक्ष मुख्य मुद्दयांवरून विचलित करू इच्छितात.-राहुल गांधी, काँग्रेस नेते

* एकाच भाषणाने मोदींनी विरोधकांना हादरवून टाकले आहे. शहरी नक्षलवाद्यांचा ‘संपत्तीचे पुनर्वितरण’ हा अजेंडा ज्या वेगाने मांडला गेला, त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुठल्या कुठे उडून जाईल.- बी. एल. संतोष, संघटन महासचिव, भाजप * मोदी खोटे बोलतात हे केवळ देशालाच नाही तर संपूर्ण जगाला माहीत आहे. काँग्रेसचे न्यायपत्र आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल ज्या प्रकारे खोटे बोलले ते अत्यंत गलिच्छ राजकारण आहे. – अखिलेश यादव, प्रमुख, समाजवादी पक्ष