भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Exam) परीक्षेत वर्ष २००० मध्ये भारतात १९ वा क्रमांक मिळवल्याचा दावा केला. यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट यूपीएससी परीक्षेची २००० मधील मेरीट लिस्टच जाहीर केली. तसेच यात संबित पात्रा नावाची कोणतीही व्यक्ती नसल्याचं सांगत संबित पात्रा यांच्यावर निशाणा साधत खोटं बोलल्याचा आरोप केला. काही काँग्रेस नेत्यांनी तर संबित पात्रा यांनी सार्वजनिक खोट बोलल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली.

काँग्रेस नेते आदित्य गोस्वामी यांनी संबित पात्रा यांचा यूपीएससी परीक्षेबाबतचा दावा करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत खोट बोलत असल्याचा आरोप केला. गोस्वामी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी वर्ष २००० मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत १९ वा क्रमांक मिळवल्याचा खोटा दावा केला होता. त्यांचा हा दावा तपासणं अगदी सोपं आहे. २००० मधील यूपीएससी परीक्षेत संबित नावाच्या कोणत्याही व्यक्तीचा क्रमांक आलेला नाही.”

pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका
Will the candidates be affected by the delay in the MPSC exam
‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने उमेदवारांना फटका बसणार का?
congress party income tax
विश्लेषण : राजकीय पक्षांना खरंच आयकर भरावा लागतो? आयकर कायद्यातील नेमक्या तरतुदी काय?
akola district, NCP, Ajit Pawar group, disputes, factionalism
अकोल्यात अजित पवार गटात धुसफूस सुरू, परस्परांवर कुरघोड्या

लेखक देवदत्त पटनायक यांनी देखील संबित पात्रा यांच्या या दाव्यावर टोला लगावत ते कदाचित दुसऱ्या संपूर्ण यूपीएससीविषयी तर बोलत नसावे ना? असं मत व्यक्त केलं. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील एक ट्वीट रिट्वीट करत संबित पात्रा यांच्यावर निशाणा साधला.

संबित पात्रा यांच्याकडून दाव्याचं समर्थन

हेही वाचा : “खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका!

भाजपा नेते संबित पात्रा यांनी मात्र आपल्या दाव्याचं समर्थन करत ट्वीट केलंय. यात त्यांनी म्हटलं, “यूपीएससी सीएसई शिवाय सीएमएस परीक्षा देखील घेते. मला वाटलं शिकलेल्या लोकांना हे माहिती आहे, मात्र त्यांना काही तथ्य माहिती नसल्याचं दिसतंय.”

दरम्यान, सोशल मीडियावर संबित पात्रा यांच्या या दाव्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. कुणी या दाव्यावर टीका करत आहे, तर कुणी या दाव्याला पाठिंबा देत आहे.