कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे जागावाटप पूर्ण; काँग्रेसकडे २० तर जेडीएसला ८ जागा

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल युनायटेडची (जेडीएस) आघाडी झाली असून आज (दि.१३) त्यांच्यातील जागा वाटपही पूर्ण झाले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल युनायटेडची (जेडीएस) आघाडी झाली असून आज (दि.१३) त्यांच्यातील जागा वाटपही पूर्ण झाले. त्यामुळे कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला २० तर जेडीएसच्या वाट्याला ८ जागा आल्या आहेत.


काही दिवसांपूर्वी दिल्लीत माध्यमांशी बोलताना माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वोसर्वा देवैगौडा यांनी म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात आपल्या पक्षाने १२ जागांचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता, मात्र १० जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानंतर, आता अंतिम चर्चेनंतर ८ जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, जर काँग्रेस-जेडीएस आघाडीने कर्नाटकात २० ते २२ जागा जिंकल्या तर पुन्हा एकदा कानडी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी नुकतेच म्हटले होते.

कर्नाटकात २८ जागांपैकी सध्या १६ जागांवर भाजपाचे खासदार आहेत. तर काँग्रेसचे १० आणि जेडीएसचे २ खासदार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress and jds seat sharing done in karnataka congress got 20 seats and jds got 8 seats out of the

ताज्या बातम्या