लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने ८० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ४३ जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळाला. उत्तर प्रदेशातील या विजयाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा – “राहुल गांधी ओडिशात आले तर मी गोडसे होईल”, काँग्रेसकडून तक्रार दाखल

fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व
Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
british pm keir starmer marathi news
विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
Pankaja Munde maharashtra legislative councile
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
ajit pawar, ajit pawar NCP Leaders, ajit pawar NCP Leaders from Nagpur, NCP Leaders from Nagpur want a Vidhan Parishad Seat, Legislative Council Elections 2024, Nagpur news,
अजित पवार गटात खदखद….विधान परिषदेच्या जागेवर…..
congress likely to contest at least 84 seats in maharashtra assembly elections
विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता

कसं असेल यात्रेचं स्वरुप?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ११ ते १५ जून दरम्यान काँग्रेसची ही धन्यवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ४०३ लोकसभा मतदारसंघातून प्रवास करणार आहे. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेतेसुद्धा या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा संदेश देण्याचा प्रयत्न या ‘धन्यवाद यात्रे’द्वारे केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान नागरिकांना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली जाणार असल्याचीही माहिती आहे.

उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला मोठं यश :

दरम्यान, या निवडणुकीत इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशात ८० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी इंडिया आघाडीला ४३ जागांवर विजय मिळाला. या ४३ जागांपैकी काँग्रेसने ६ तर समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपाला ३३ जागांवर विजय मिळाला आहे.

हेही वाचा – तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

महत्त्वाचे म्हणजे २०१९ च्या तुलनेत यंदा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले होते. या निवडणुकीत दोघांना मिळून केवळ ६ जागांवर विजय मिळवला आला होता.