काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. २७ ऑगस्टला पाऊलो मायनो याचं निधन झालं आहे. त्यांच्यावरती मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं २७ ऑगस्ट रोजी इटलीत त्यांच्या राहत्या घरी निधनं झालं आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे.


दरम्यान, सोनिया गांधी मागील आठवड्यात आपल्या आईंना भेटण्यास इटलीला गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा सुद्धा होते. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा या सातत्याने आपल्या आजींना भेटण्यास जात असे. २०२० साली राहुल गांधी सतत विदेशात जात होते, तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर राहुल गांधी हे इटलीतील आजारी नातेवाईकास भेटण्यास जात आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाऊलो मायनो यांच्या निधानावरती ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. सोनिया गांधीजी यांच्या आई श्रीमती पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या संवेदना संपूर्ण कुटुंबासमवेत आहेत, असा शोक पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.