love jihad funding Case Congress councillor charged under NSA : मध्य प्रदेशामधील इंदोर येथील काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कादरी यांच्यावर हिंदू महिलांना फसविण्यासाठी आर्थिक प्रलोभन देऊन लव्ह जिहादचा कट रचल्याच्या आरोप आहे.

या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वादळ उठल्याचे पाहयला मिळत आहे. इतकेच नाही तर तीन व्यक्तींनी हिंदू महिलांना फसवण्यासाठी कादरी यांनी पैसे दिल्याचे सांगितल्यानंतर हे प्रकरण चांगलेच पेटल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला.

दोन आठवड्यांपूर्वी बनगंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर जेव्हा साहिल शेख आणि अल्ताफ अली या दोघांना इंदोर पोलिसांनी अटक केली, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. दोन हिंदू महिलांनी आरोप केला ही या दोघांनी प्रेमसंबंध प्रस्थापित करताना त्यांची धार्मिक ओळख लपवून ठेवली आणि त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक शोषण केले.

दरम्यान पोलिस चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांनी साहिल याला दोन लाख तर अल्ताफ याला एक लाख रुपये हे हिंदू महिलांना फसवणे, त्यांच्याशी लग्न करून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दिले. या दोघांना अटक केल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळाल्या.

पोलिसांनी कादरी यांच्याविरोधीत धर्म स्वातंत्र्य कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. मात्र कादरी यांची गु्न्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता आणि आरोपांची गंभीरता लक्षात घेता त्याच्या विरोधात इंदोर जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एफआयआर दाखल झाल्यापासून कादरीचा फरार असल्याने, त्याच्या अटकेची माहिती देणाऱ्याला प्रशासनाकडून १०,००० रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.