पीटीआय, नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार आहे. परंतु यामध्ये पक्षाच्या वतीने कोण उपस्थित राहणार याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. ‘विरोधी पक्षाच्या १२ जून रोजी होणाऱ्या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार आहे. परंतु पक्षाच्या वतीने कोण उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.




काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पाटणा बैठकीत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील किंवा नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसला मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीत पक्षाला प्रमुख स्थान असावे, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी विविध पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षशासित राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाटणा येथील बैठक निश्चित केली आहे. या बैठकीला विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.