‘सत्तेत असताना काँग्रेसने गुजरातच्या विकासासाठी काय केले?’

नर्मदा नदीच्या विकासासाठी काँग्रेस उदासीन

फोटो सौजन्य-एएनआय

काँग्रेस पक्षाची देशात सत्ता होती तेव्हा त्यांनी गुजरातचा विकास व्हावा यासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नर्मदा नदीचा विकास व्हावा यासाठी काँग्रेसने कितीवेळा आवाज उठवला? मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच नर्मदा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळण्यात प्रयत्न होताना दिसत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीएसटीवरून निशाणा साधला होता. जीएसटी म्हणजे सरकारने लागू केलेला गब्बर सिंग टॅक्स आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेलाही सीतारामन यांनी उत्तर दिले. राहुल गांधी यांच्या टीकेला काहीही अर्थ नाही. असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress did nothing for gujarat when it ruled country sitharaman

ताज्या बातम्या