काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची आज ( २६ सप्टेंबर ) घोषणा केली आहे. ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे या नव्या पक्षाचे नाव आहे. तीन रंगांच्या धर्मनिरपेक्ष ध्वजाचेही आझाद यांच्याकडून अनावरण करण्यात आले आहे. काँग्रेसमधून सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३७० कलम पुन्हा लागू करणं माझा अजेंडा नाही; गुलाम नबी आझाद

दरम्यान, कार्यकर्त्यांकडून पक्षासाठी १५०० नावं सुचवण्यात आल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. पक्षाचे नाव धर्म आणि संस्कृतीनुसार ठेवण्यात आल्याचे आझाद यांनी सांगितले आहे. “देशभरातून पक्षासाठी १५०० नावांची यादी प्राप्त झाली होती. यामध्ये काही उर्दू आणि संस्कृत नावांचा समावेश होता. सर्वांना समजेल असे नाव आम्हाला ठेवायचे होते. त्यानुसार ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ हे नाव ठेवण्यात आले आहे”, असे आझाद म्हणाले आहेत.

काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागले, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले – गुलाम नबी आझाद

“या पक्षात कुठलाही भेदभाव नसेल. पक्षावर कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा प्रभाव नसेल. सर्व धर्मीयांना या पक्षात प्रवेश करण्याची मुभा असेल”, असे आझाद म्हणाले आहेत. पक्षाच्या ध्वजाचे रंग सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि शांतीचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २००५-२००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ex leader gulam nabi azad announced new party named democratic azad party rvs
First published on: 26-09-2022 at 13:52 IST