आमदार फुटण्याच्या भीतीने गोवा काँग्रेसने आपले पाच आमदार चेन्नईला पाठवले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. तसेच गोव्या पुन्हा ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, काँग्रेसने चेन्नईच पाठवलेल्या आमदारांमध्ये आमदार संकल्प अमोनकर, अल्टॉन डस्कोटा, कार्लोस अल्वेरा, रुडॉल्फ फर्नांडीस आणि युरी अलिमो यांचा समावेश आहे.

हेही वाचा – पंजाबमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल

गेल्या काहा दिवसांपासून गोव्यात काँग्रेचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. गोव्याचे काँग्रेस आमदार मायकेल लोबो हे काही आमदारांसह बंडखोरी करत भाजपा प्रवेश करणार असल्याचेदेखील बोलले जात होते. तसेच गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी काँग्रेस आमदारांना भाजपात प्रवेशासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्या जात असल्याचादेखील आरोप केला होता. दरम्यान, गोवा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते मायकेल लोबो यांना विरोधा पक्षनेते पदावरूनही हटवण्यात आले होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या ‘गरज पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढून शिंदे गटाला रोखू’ वक्तव्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही आधी…”

दरम्यान, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांनीही आमदार बंडखोरी करणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. विधानसभा अधिवेशनापूर्वी जाणूनबुजून भाजपाकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचा आरोप लोबो यांनी केला होता.