नेहरु जयंतीच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या नेत्यांनीच मारली दांडी; पक्षाकडून नाराजी व्यक्त

आज १४ नोव्हेंबर ही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आहे.

जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त संसदेतल्या पारंपरिक कार्यक्रमाला एकही ज्येष्ठ मंत्री उपस्थित नव्हता. याकडे त्यांच्या नेत्यांनी लक्ष वेधल्याने काँग्रेस आज प्रचंड नाराज झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली, असे पक्षाने म्हटले आहे. १४ नोव्हेंबर ही देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची जयंती आहे आणि दरवर्षी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो.

काँग्रेसचे जयराम रमेश यांनी ट्विट केले: “ज्यांच्या प्रतिमा सेंट्रल हॉलमध्ये शोभतात त्यांच्या जयंतीनिमित्त पारंपारिक कार्यक्रमात आज संसदेत लोकसभा अध्यक्ष अनुपस्थित, राज्यसभेचे अध्यक्ष अनुपस्थित, एकही मंत्री उपस्थित नाही. यापेक्षा जास्त अत्याचार कोणता?”

इतर विरोधी नेत्यांनीही या कारवाईचा निषेध केला.

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले आहे की, “मला याहून अधिक आश्चर्य कशाचंच वाटत नाही. अशा वागण्यामुळे एका दिवसात संसदेसह भारतातील महान संस्था नष्ट होत आहे.”

आज सकाळी सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा उपस्थित होते. याशिवाय राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरूंच्या पोर्ट्रेटचे अनावरण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस राधाकृष्णन यांनी ५ मे १९६६ रोजी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये केले होते.

स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त नियोजित मोठ्या आझादी का अमृत महोत्सवासाठी बनवलेल्या पोस्टर्समधून नेहरूंचा फोटो गायब झाल्यानंतर काँग्रेसने यापूर्वी सरकारला साद घातली होती. या निर्णयाला “अत्याचारपूर्ण” संबोधून, रमेश यांनी ट्विट केले होते: “या राजवटीने आणि विद्वानांचा मुखवटा धारण करणार्‍या टोळ्यांचं हे वागणं आश्चर्यकारक नसून अत्याचारी आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress fumes as senior ministers veep speaker skip jawaharlal nehru anniversary vsk

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?