Congress government Rajasthan crisis Opposition Gehlot MLAs resignation ysh 95 | Loksatta

राजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा

मुख्यमंत्री गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा देत विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले.

राजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा
बसमधून राजस्थान विधानसभा अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे निघालेले काँग्रेस आमदार बी. डी. कल्ला यांच्यासह गेहलोत समर्थक आमदार.

पीटीआय, जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्षांचा नवा अंक रविवारी सुरू झाला. मुख्यमंत्री गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा देत विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार संकटात आले आहे. 

 अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगे बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही दाखल झाले. बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र बैठकीपूर्वी त्यांच्याच समर्थकांनी राजीनामास्त्र उगारले.

गेहलोत समर्थक आमदार बैठकीकडे फिरकले नाहीत. त्याऐवजी ते मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमून बसमधून विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या घरी गेले. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास या आमदारांचा विरोध आहे. यावेळी अपक्षांसह सुमारे ८० आमदार एकत्र असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. ‘‘आपण राजीनामे देण्यासाठी आलो आहोत,’’ असे राज्यमंत्री प्रतापसिंह खचारियावास यांनी जाहीर केले, तर ‘‘आमदारांच्या भावना लक्षात न घेता निर्णय घेतला गेला, तर सरकार अडचणीत येईल,’’ असा इशारा अपक्ष आमदार सन्यम लोढा यांनी दिला.

 गेहलोत पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या खुर्चीत पायलट यांना विराजमान करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतल्याची चर्चा आहे. गेहलोत यांना स्वत:च्या मर्जीतील आमदाराला मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे. त्यामुळे पायलट आणि गेहलोत यांच्यामध्ये पुन्हा सत्तासंघर्षांची ठिणगी पडली आहे. यावर सर्वमान्य तोडगा काढण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.

नाराज आमदारांची मागणी काय?

२०२०मध्ये पायलट यांच्या बंडावेळी सरकार वाचवणाऱ्यांपैकी एखाद्याला मुख्यमंत्री करावे, बंड घडवणाऱ्यांना नव्हे, अशी गेहलोत समर्थक आमदारांची मागणी आहे. गेहलोत पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही पदे सांभाळण्यासही सक्षम असल्याचा दावा समर्थक करत आहेत. २०२०मध्ये पायलट यांनी काही आमदारांसह बंडाचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

संख्याबळ असे..

राजस्थान विधानसभेच्या २०० सदस्यांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ १०८ आहे. शिवाय पक्षाला १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. अपक्षांमध्येही गेहलोत समर्थक अधिक आहेत. भाजपचे संख्याबळ ७० आहे. काँग्रेसच्या गेहलोत समर्थक ८० हून अधिक आमदारांनी राजीनामा दिल्यास सरकार कोसळू शकेल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले

संबंधित बातम्या

Ravish Kumar Resigned: “..हाच माझा नवा पत्ता”, रवीश कुमार यांची NDTVतून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; पुढील वाटचालीचे संकेत!
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”
Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO
Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा
Bharat Jodo Yatra: “मेहनत घेणं चांगलंच, पण त्यात…”; अमित शाहांची राहुल गांधींवर मार्मिक टिप्पणी
Video : जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?
पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह
धक्कादायक ! दोन कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीलाच दिली मारण्याची सुपारी