प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान!; रायपूरला फेब्रुवारीत पक्षाचे ८५ वे अधिवेशन | Congress Haath Se Haath Jodo campaign since Republic Day amy 95 | Loksatta

प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान!; रायपूरला फेब्रुवारीत पक्षाचे ८५ वे अधिवेशन

‘भारत जोडो यात्रे’पाठोपाठ २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अर्थात ‘हाताला हात द्या’ अभियान सुरू करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान!; रायपूरला फेब्रुवारीत पक्षाचे ८५ वे अधिवेशन

पीटीआय, नवी दिल्ली

‘भारत जोडो यात्रे’पाठोपाठ २६ जानेवारीपासून देशभरात काँग्रसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अर्थात ‘हाताला हात द्या’ अभियान सुरू करण्यात येणार आहे.छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे येत्या नवीन वर्षांत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ात काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे. पक्षाचे हे ८५ वे अधिवेशन असेल. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांच्या पक्षाच्या अध्यक्षपद निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणी स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. पक्षाध्यक्ष खरगे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबतचा हा निर्णय घेण्यात आला.

सुकाणू समिती बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर २६ जानेवारीपासून देशभरात पक्षाकडून ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करण्यात येणार आहे, त्यामध्ये गट, गण, पंचायत स्तरावर जनसंपर्क केला जाईल. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेचे राहुल गांधींचे निवेदन असलेले पत्रही जनतेला दिले जाईल, ज्यामध्ये यात्रेचा संदेश असेल. तसेच सोबत मोदी सरकारविरोधातील आरोपपत्रही जोडलेले असेल. पक्षातर्फे ‘महिला यात्रा’ही काढण्यात येईल, त्याचे नेतृत्व प्रियंका गांधी-वद्रा करतील.

सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले, की ‘भारत जोडो यात्रा’ २४ डिसेंबरला दिल्लीला पोहोचेल व २६ जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये तिची सांगता होईल. ते म्हणाले, ‘‘या भेटीनंतर ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ अंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम होणार आहे. ‘ब्लॉक’-‘बूथ’ स्तरावर यात्रा, जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर सभा होतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस प्रियंका गांधी-वद्रा आदी नेते ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या कार्यक्रमांत सहभागी होतील. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आदी अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी असल्याने सभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

काम करा, नाहीतर पद सोडा : खरगे यांचा इशारा
खरगे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सुकाणू समितीची बैठक झाली. गेल्या महिन्यात पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खरगे यांनी पक्षाची सर्वोच्च संस्था काँग्रेस कृती समितीच्या जागीकनिष्ठ स्तरापर्यंत सर्वाची पक्षाला बांधिलकी असली पाहिजे. काँग्रेसने दिलेली जबाबदारी पार पाडणे अनिवार्य आहे. तसे करण्यास जे असमर्थ आहेत त्यांनी नव्या लोकांना संधी द्यावी, असेही स्पष्ट केले.पक्षाचे सरचिटणीस व प्रदेश प्रभारी यांनी प्रथम स्वत:ची जबाबदारी निश्चित करून जनआंदोलनाच्या संदर्भात ३० ते ९० दिवसांत आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 01:18 IST
Next Story
गुजरात निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी घेतली आईची भेट, आशीर्वाद घेतले