scorecardresearch

VIDEO: तेलंगणात काँग्रेसने देवीच्या रुपात सोनिया गांधींचा लावला पोस्टर; भाजपाकडून टीका

तेलंगणात काँग्रेसने सोनिया गांधी यांचा फोटो देवीच्या रुपात लावल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

sonia gandhi as goddess
सोनिया गांधींचा देवीच्या रुपातील पोस्टर (फोटो सौजन्य-पीटीआय)

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं तेलंगणात देवीच्या रुपात पोस्टर लावण्यात आलं आहे. या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर टीका केली आहे. पोस्टर्समध्ये सोनिया गांधी देवीप्रमाणे रत्नजडित मुकुट परिधान केलेल्या दाखवल्या आहेत. पोस्टर्समध्ये त्यांच्या उजव्या तळहातातून तेलंगणाचा नकाशा बाहेर पडताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत. आहे.

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही कृती लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच देशातील सर्वात जुन्या पक्षाने नेहमीच त्यांचा परिवाराला देश आणि देशातील लोकांपेक्षा मोठं असल्याचं दाखवलं आहे, अशी टीका पूनावाला यांनी केली. काँग्रेसला भारताचा अपमान करण्याची सवय लागली आहे, असंही पूनावाला म्हणाले.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Love to eat peanut Chiki Viral video from factory think 100 times before eating it
शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

खरं तर, रविवारी हैदराबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक पार पडली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर, सोनिया गांधी यांनी तेलंगणातील तुक्कुगुडा येथे एका रॅलीला संबोधित केलं. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन व्हावं, हे माझं स्वप्न आहे. आपलं सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress in telngana shown sonia gandhi as goddess in posters viral video bjp slams rmm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×