संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (२६ जून) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिप जारी करत बुधवारी सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांना उद्या सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभेत उद्या महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईन, त्यासाठी काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असं व्हिप जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

rahul gandhi appointed as LoP in loksabha
मोठी बातमी! लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब; के.सी. वेणूगोपाल यांची माहिती
Ashwini Koshta mother
पुणे पोर्श अपघात: आरोपीला जामीन मिळताच अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या…
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Praful Patel
प्रफुल पटेल यांचा मोठा दावा; म्हणाले, “थोडा वेळ जाऊद्या, इंडिया आघाडीतील अनेक लोक…”
kenya protests over tax raise bill
केनियात करवाढीविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर; आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न
Trinamool Congress vs Congress Lok Sabha Speaker
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
Parliament Session 2024 LIVE Updates in Marathi
Parliament Session 2024 Updates : लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं? तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात राडा?

हेही वाचा : लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”

दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुधवारी (२६ जून) रोजी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता याआधी फक्त दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिली १९५२ ची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यानंतर आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अशाच प्रकारे अध्यक्षपदावर सहमती न झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर थेट यावेळी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीए आणि विरोधकांमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, इंडिया आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरला. मात्र, उपाध्यक्षपद देण्यास एनडीएने नकार दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. आम्ही विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. पण लोकसभेचं उपसभापतीपद विरोधकांना मिळालं पाहिजे.  मल्लिकार्जुन खरगे यांना फोन परत करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.