Congress Criticize PM Modi : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदींना त्यांच्या २०१३ च्या विधानाची आठवण करून दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी यूपीए सरकारच्या नेतृत्वावर टीका करताना ते दिशाहीन झाले असून त्यांना ना देशाच्या रक्षणाची चिंता आहे न घसरणाऱ्या रुपयाच्या किंमतीची, त्यांना फक्त आपली खुर्ची टिकवून ठेवण्याची चिंता आहे, असे मोदी म्हणाले होते.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारवर धारेवर धरले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुद्द्यांवर बोलण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. २०१३ मध्ये जेव्हा यूपीए सरकारच्या काळात रुपयाची किंमत घसरली होती तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती, या मुद्द्यावर देखील काँग्रेसने पंतप्रधान मोदींनी लक्ष्य केले आहे.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “गुजरातच्या तेव्हांच्या बायोलॉजिकल मुख्यमंत्र्यांनी २०१४ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या विरोधात जोरदार मोहीम चालवली होती, अगदी राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. १६ मे २०१४ रोजी रुपया ५८.५८ प्रति यूएसडीवर बंद झाला. दहा वर्षांनंतर, रुपयाने प्रति यूएसडी ८५.२७ ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे. भारतीय रुपया आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन ठरले आहे”.

जयराम रमेश पुढे बोलताना म्हणाले की, “लक्षात ठेवा की, हे सर्व अवमूल्यन (रुपयाच्या किमतीत) सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे चलन धोरण असूनही होत आहे. पंतप्रधानांच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागारानेही काही दिवसांपूर्वीच याबद्दल भाष्य केले आहे. आरबीआयने रुपया स्थिर करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा वापरला आहे, त्याचा काहीही परिणाम झाला नाही”.

“नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांकडे आता शब्दच नाहीत, पण आपण त्यांना २०१३ मधील त्यांच्या शब्दांची आठवण करून देऊ या”, असे म्हणत जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींना त्यांनी केलेल्या २०१३ च्या विधानाची आठवण करून दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, “संकट येतात, पण संकटाच्या वेळी जर नेतृत्व दिशाहीन, हताश असेल तर संकट खूप गंभीर बनते… हे आपल्या देशाचे दुर्दैव हे की दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना ना देशाच्या संरक्षणाची चिंता आहे ना रुपयाच्या घसरत्या किंमतीची… काळजी वाटत असेल तर ती फक्त त्यांची खुर्ची वाचवण्याची”. दरम्यान सोमवारी रुपयाच्या मूल्यात पुन्हा घसरण पाहायला मिळाली, तो ८५.५२ रुपये प्रति डॉलरवर पोहचला.

Story img Loader