देशाची संपत्ती गरीबांची आहे. मात्र, भाजपा ती काही श्रीमंत लोकांना दिली जात असल्याचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातच्या दाहोत या आदिवासी जिल्ह्यातील सत्याग्रह रॅलीला त्यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन भारत बनवले एक गरीबांसाठी आणि दुसरा श्रीमंतांसाठी असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा- ‘उद्यापर्यंत प्रलंबित देशद्रोहाच्या खटल्यांबाबत भूमिका स्पष्ट करा’, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश


गुजरातमध्ये पुन्हा काँग्रेस सरकारच येईल
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. गुजरातमध्ये पुन्हा काँग्रेस सरकारच येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान बनण्याआगोदर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी जे केलं तसचं ते आता करत आहेत. भाजपा केवळ श्रीमंतांच्या बाजून असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा- ‘कुतुबमिनार नाही, तर विष्णू स्तंभ’, दिल्लीत हिंदुत्ववाद्यांकडून हनुमान चालिसा वाचत दावा, पोलिसांकडून धरपकड


गुजरात हे एकमेव राज्य आहे जिथे आंदोलन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते
गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, गुजरात हे एकमेव राज्य आहे जिथे आंदोलन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणीला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागल्याचेही राहुल गांधी म्हणाले


गुजरातमधील आदिवांसीची जी इच्छा आहे तेच काँग्रेस सरकार करेल
गुजरातची प्रत्येक वीट आदिवासींनी रक्त आणि घामाने रचली आहे. पण त्यांना त्यांचे हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. आदिवासी सत्याग्रह ही जल, जंगल आणि जमीन यासाठीची चळवळ आहे. भाजपा सरकार तुम्हाला काहीही देणार नाही पण तुमच्याकडून सगळं हिरावून घेईल असा आरोपही त्यांनी केला आहे. गुजरातमधील आदिवांसीची जी इच्छा आहे तेच काँग्रेस सरकार करेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी गुजरातमधील आदिवासी बांधवांना दिले आहे.