गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल यांच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयात त्यांच्या भरत पटेल यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बातमीनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फोनवरून हार्दीक पटेल यांच्याशी संवाद साधत संवेदना व्यक्त केल्या. हार्दीक पटेल यांनाही करोनाची लागण झाली आहे. २ मे रोजी त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.

गुजरातमध्ये गेल्या २४ तासात ११, ८९२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ६ लाख ६९ हजार ९२८ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ११९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये ८,२७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ४२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्राची २५ राज्यांना मोठी मदत; उत्तर प्रदेशला सर्वाधिक १४४१ कोटी, तर महाराष्ट्राला ८६१ कोटी!

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं आहे. दररोज चार लाखांच्या आसपास नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली असून, लॉकडाउन देखील लागू करण्यात आलेला आहे. ५,५०,००० पेक्षा अधिक एकूण कोरनाबाधित संख्या असलेली राज्यामध्ये गुजरात राज्य मोडतं. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून देखील पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने रविवारी २५ राज्यांसाठी मोठा निधी जाहीर केला. केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना ८९२३.८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. गुजरातला ४७२.४ कोटी इतकं अनुदान मिळालं आहे.