काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांना दुसऱ्यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. करोना नियमांनुसार सध्या त्या गृह विलिगीकरणात आहेत. याआधी ३ जूनला प्रियांका गांधींसह सोनिया गांधींना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता परत प्रियांका गांधी करोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत.

करोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस; ३५ जणांना लागण, जाणून घ्या काय आहे लक्षणे

“करोना चाचणी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या गृह विलिगीकरणात असून करोना नियमांचे पालन करत आहे” अशा आशयाचे ट्वीट प्रियांका गांधींनी केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील आजारी आहेत. त्यामुळे राजस्थानातील अलवर दौरा त्यांनी रद्द केला आहे. अलवर काँग्रेसकडून आयोजित नेतृत्व संकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी सहभागी होणार होते.

महागाई आणि जीएसटीविरोधात काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आले होते. दिल्लीच्या काँग्रेस कार्यालयापासून प्रियांका गांधींच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर आता प्रियांका गांधींना करोना झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १२ हजार ७५१ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ७०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ४ कोटी ४१ लाख ७४ हजार ६५० करोना रुग्ण आढळून आले आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजारांनी कमी झाली आहे. गेल्या २४ तासात ४२ जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे. आत्तापर्यंत ५ लाख २६ हजार ७७२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

“आजच लिहून ठेवा, हे सरकार कोसळणार आणि तेही…”, बिहार भाजपा नेते सुशील मोदींचा इशारा

देशात सध्या एकुण करोना प्रसाराच्या ०.३० टक्के सक्रीय रुग्ण आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५१ टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.