“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”; काँग्रेस नेते राहुल गांधींचं टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीवरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Rahul-Gandhi-3
(Photo- Indian Express)

गेल्या काही महिन्यापासून राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. रोजच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. आजही त्यांनी बेरोजगारीवरून त्यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. रोजगाराच्या बाबतीत सरकारची धोरणं निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या ‘मित्रहीन’ व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन किंवा समर्थन देत नाहीत. ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्याही हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीयांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. दुसरीकडे सीएमआयईने जारी केलेल्या अहवालात चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये १५ लाखांहून अधिक लोकं औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रांतून बेरोजगार झाले आहेत, अशी माहिती सीएमआयईने आपल्या अहवालात दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनता त्रस्त आहे आणि यामुळे जनतेला त्रास होत आहे. मोदीजींचे केवळ ४-५ उद्योगपती मित्रांना नोटाबंदीचा लाभ मिळत आहे. देशाचा जीडीपी वाढत आहे, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सातत्याने कमी होत आहेत, असे असूनही आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज भारताची मालमत्ता विकली जात आहे पण हा पैसा कुठे जातो हा प्रश्न आहे, असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी विचारला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, “अर्थव्यवस्था अपयशी ठरत आहे. शेअर बाजारात तेजी आहे, पण त्यामध्ये केवळ ५० कंपन्या वाढत आहेत. देशातील ३०० ते ४०० प्रमुख कंपन्यांची स्थिती खालावत आहे. ते देशाचे भविष्य आहेत, पण त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. मध्यमवर्गीय उद्योग देशाला रोजगार देतात, पण मोदीजींच्या मनात त्यांच्यासाठी स्थान नाही.”

ज्या दिवशी भीषण अपघात झाला…

भारतीय युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनात बनवलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी वडिलांसोबत विमानात घालवलेल्या आठवणी सांगितल्या. ते दररोज सकाळी वडिलांसोबत विमानात बाहेर जायचे आणि दोघांनाही विमान उडवणे आवडायचे. व्हिडिओमध्ये राहुलने त्यांचे काका संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची आठवण करून दिली आणि सांगितले की, ज्या दिवशी भीषण अपघात झाला त्या दिवशी राजीव गांधींनी आपल्या लहान भावाला विमान उडवण्यास मनाई केली होती. राहुल गांधी म्हणाले, “माझे काका एक विशेष प्रकारचे विमान उडवत होते – ते पिट्स विमान होते. ते खूप वेगवान विमान होते. माझ्या वडिलांनी त्यांना रोखले होते. पण त्यांनी ऐकले नाही. माझ्या काकांना तेवढा अनुभव नव्हता. काकांना केवळ तीन ते साडेतीन तास विमान उडवण्याचा अनुभव होता. २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress leader rahul gandhi blame modi government about employment rmt

ताज्या बातम्या