“हम दो, हमारे दो की सरकार”, राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदींना मैत्री दिनाच्या खोचक शुभेच्छा

मैत्री दिनाचं औचित्य साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक शुभेच्छा दिल्या आहेत.

Rahul-Gandhi
"हम दो हमारो दो की सरकार", काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदींना मैत्री दिनाच्या खोचक शुभेच्छा (संग्रहित फोटो)

जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्री दिनाचं औचित्य साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. मैत्री दिनाच्या शुभेच्छा “हम दो, हमारे दोनो की सरकार” अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. राहुल गांधी यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासातच हजारोंच्या संख्येनं लाईक्सचा वर्षाव झाला आहे. त्याचबरोबर अनेकांनी टीका करणाऱ्या कमेंट्सही दिल्या आहेत. कमेंट्समध्ये काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार उद्योगपतींच सरकार असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. एका फोटोत नरेंद्र मोदी गौतम अदानी यांच्यासोबत विमानात दिसत आहेत. त्यानंतर मुकेश अंबाना आणि गौतम अदानी यांची गळाभेट घेताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)

राहुल गांधी यांनी अनेकदा मोदी सरकार हे उद्योगपतींचं सरकार असल्याची टीका केली आहे. भाजपानेही या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. रविवारी राहुल गांधी यांनी करोना लसींच्या तुटवड्यावरून सरकारला जाब विचारला होता. “जुलै महिना निघून गेला आणि लसींचा तुटवडा काही संपला नाही” असं ट्वीट केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress leader rahul gandhi criticism friendship wishes to prime minister modi rmt