काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘जय श्री राम’ या नाऱ्यावरुन भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “भाजपाचे लोक ‘जय श्री राम’ बोलतात. पण ते कधी ‘जय सिया राम’ किंवा ‘हे राम’ का म्हणत नाहीत?” याचं थेट उत्तर देत राहुल गांधींनी सडकून टीका केली आहे. “ते ‘जय सिया राम’ कधीच म्हणणार नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. “सिता आणि राम एक आहेत, असा ‘जय सिया राम’चा अर्थ आहे. त्यामुळेच ‘जय सिया राम’ किंवा ‘जय सिता राम’ असा नारा आहे”, असं ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राम सीतेच्या सन्मानासाठी लढले. त्यामुळे आपण जेव्हा ‘जय सिया राम’ बोलतो. तेव्हा सीतेची आठवण काढतो. समाजातील सीतेच्या स्थानाचा आदर करतो”, असं मध्य प्रदेशातील आगर मालवामधील सभेत गांधी यांनी म्हटलं आहे. “भाजपा आणि आरएसएसची लोकं ज्या भावनेनं राम आपलं आयुष्य जगले, त्याप्रमाणे जगत नाहीत. कारण रामाने कोणासोबत अन्याय केला नाही. रामाने समाजाला जोडण्याचं कामं केलं. रामाने सर्वांना सन्मान दिला. त्यांनी शेतकरी, मजूर, व्यापारी सर्वांचीच मदत केली. त्यांची जगण्याची पद्धत आरएसएस आणि भाजपाचे लोक स्वीकारत नाहीत”, असा हल्लाबोल गांधींनी यावेळी केला.

चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध

“महात्मा गांधींजी नेहमी ‘हे राम’ म्हणायचे. तो त्यांचा नारा होता. भगवान राम हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर प्रेम, बंधुत्व, आदर आणि तपश्चर्या या जीवनपद्धतीचं प्रतिक होते. जेव्हा गांधींजी हे राम म्हणायचे, तेव्हा रामाचे आदर्श आपल्या व्यक्तीमत्वात असून आपल्याला त्याचं पालन करावं लागेल, असा या नाऱ्याचा अर्थ असायचा”, असं गांधी यांनी या सभेत सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi criticized rss and bjp over jai siya ram and hey ram slogans in bharat jodo yatra at madhya pradesh rvs
First published on: 03-12-2022 at 08:07 IST