काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील तीन शहरांमध्ये राहुल गांधी संबोधित करत आहेत. न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे राहुल गांधी नागरिकांशी चर्चा करणार आहे. त्यापूर्वी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सहा दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी
हेही वाचा : भारताची लोकशाही कोसळणे जगासाठी घातक -राहुल गांधी
रविवारी ( ४ जून ) राहुल गांधी न्यूयॉर्कमधील जेविट्स सेंटर येथे संबोधित करणार आहेत. त्याआधी न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा व्हिडीओ झळकला आहे. याचा व्हिडीओ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर व्हायरल केला जात आहे. तसेच, जेविट्स सेंटर येथील कार्यक्रम पार पाडण्यासाठी तेलंगणा काँग्रेस
हेही वाचा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने का भिरकावला माईक? व्हिडीओ व्हायरल
न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर जाहिरातीसाठी किती खर्च?
न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे. येथे एक दिवसाला जाहिरातीसाठी ५ हजार डॉलर ते ५० हजार डॉलरपर्यंत ( ४ लाख ते ४१ लाख रुपये ) भाडे आकारण्यात येते. व्हिडीओच्या वेळेनुसार भाडे आकारले जाते.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi features on times square bill board in news york know how much does cost ssa