scorecardresearch

Premium

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची आज आमदारांशी चर्चा!

दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचेच लक्ष

rahul gandhi congress
आज काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे व त्यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (संग्रहीत छायाचित्र)

सध्या पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा मुद्दा चांगलाच चर्चेत येत आहे. तर, आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पार्टी हायकमांडून या कलहावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पंजाबमधील आमदारांशी दिल्लीत चर्चा होणार आहे. काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांची भेट दिल्लीतील राहुल गांधींच्या निवासस्थानी होणार आहे.

पंजाब काँग्रेसमधील असंतोषाच्या मुद्य्यावर मागील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री अमिरदर सिंग, त्यांचे स्पर्धक नवज्योतसिंग सिद्धू, इतर नेते-आमदार यांनी दिल्लीत हजेरी लावली आणि आपापले म्हणणे श्रेष्ठींनी नेमलेल्या समितीपुढे मांडलेले आहे. त्यामुळे आज काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे व त्यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Rahul Gandhi VBA Prakash Ambedkar
वंचितला ‘इंडिया’ आघाडीत घेण्याच्या मागणीसाठी मुस्लीम बांधवांचं राहुल गांधींच्या घरासमोर आंदोलन
Sharad Pawars meeting in gondia
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; गोंदियात लवकरच सभा, सभेनंतरच कळणार…
Chief Minister Ashok Gehlot and former Deputy CM Sachin Pilot
गहलोत-पायलट यांच्यात दिलजमाई; पण कार्यकर्त्यांमध्ये मनभेद कायम, काँग्रेससमोर आव्हान
sharad pawar remark against Fascist forces
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’

पंजाब प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने अ.भा. काँग्रेस समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या समितीने तिचा अहवाल गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि माजी खासदार जे.पी. अगरवाल यांचा समावेश होता. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीने यापूर्वी राज्यातील अनेक नेत्यांशी विचारविनिमय केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader rahul gandhi to meet party mlas from punjab today at his residence in delhi msr

First published on: 25-06-2021 at 08:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×