scorecardresearch

Budget 2023 : शशी थरूर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया; म्हणाले, “काही मूलभूत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला.

SHASHI THAROOR AND NIRMALA SITHARAMAN
शशी थरूर, निर्मला सीतारामन (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला समोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने यावेळी विशेष तरतूद केली आहे. मात्र विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर आक्षेप नोंदवला जात आहे. या अर्थसंकल्पात गरीब, बेरोजगारी, महागाईबाबत काहीही नाही, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसेचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील यंदाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ते एएनआयशी बोलत होते.

हेही वाचा >>> मशिदीतील बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी मंत्र्याचे विधान; म्हणाले, “भारतातही भाविक मारले गेले नाहीत, पण…”

रोजगार आणि महागाई कमी करण्यासाठी कसलीही तरतूद नाही

“या अर्थसंकल्पात काही चांगल्या बाबींचा समावेश आहे. मात्र मनरेगाबाबत काहीही नाही. तसेच ग्रामीण भागातील मजूर, रोजगार आणि महागाई कमी करण्यासाठी कसलीही तरतूद नाही. या अर्थसंकल्पामुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे,” अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.

नक्की पाहा >>> Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

काँग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे यांनीदेखील अर्थसंकल्पातील तरतुदींवर बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. “आगामी काळात तीन ते चार राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका समोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात गरीब लोकांसाठी तसेच महागाईला रोखण्यासाठी काहीही नाही. नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठीही अर्थसंकल्पात काहीही नाही,” अशी प्रतिक्रिया मलिल्कार्जुन खरगे यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:06 IST