काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतल्या सर गंगाराम रूग्णालयात सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांना ताप आल्याने रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. चेस्ट मेडिसिनचे डॉक्टर अरूप बसू आणि त्यांची टीम सोनिया गांधींवर उपचार करते आहे. काही चाचण्याही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे अशीही माहिती समोर आली आहे.
रूग्णालयातर्फे जारी करण्यात आलं बुलेटीन
मेडिकल बुलेटीनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना ताप आल्याने त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सोनिया गांधी यांना २ मार्चला या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अरूप बसू आणि त्यांची टीम सोनिया गांधी यांच्यावर उपचार करते आहे. सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
याआधी जानेवारी महिन्यात सोनिया गांधी यांना व्हायरल इनफेक्शन झालं होतं ज्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना घडल्यानंतर भारत जोडो यात्रेत असलेले राहुल गांधी हे यात्रा सोडून आई सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. जानेवारी महिन्यात सोनिया गांधी यांना सुमारे एक आठवडा रूग्णालयात रहावं लागलं होतं त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा एकदा ताप आल्याने सोनिया गांधी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.