scorecardresearch

काँग्रेस नेत्यावर काळी जादू ? घरातून ९ व्यांदा मिळाल्या रहस्यमय गोष्टी, एफआयआर दाखल

रविवारी त्यांच्या घराबाहेरील बागेत एक बंद बाटली पुरलेली आढळली. यामध्ये तांब्याच्या काही विचित्र वस्तू सापडल्या, त्यानंतर…

केरळचे ज्येष्ठ काँग्रेस नेता व्ही.एम.सुधीरन यांनी काळ्या जादूच्या संशयातून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. रविवारी त्यांच्या घराबाहेरील बागेत एक बंद बाटली जमिनीत पुरलेली आढळली. यामध्ये तांब्याच्या काही विचित्र वस्तू सापडल्या, त्यानंतर सुधीरन यांनी काळ्या जादूच्या संशयातून पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

अशाप्रकारच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत, पण मी यावेळी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. नवव्यांदा अशाप्रकारची घटना घडली, असं सुधीरन यांनी माध्यमांना सांगितलं. सापडलेल्या सर्व वस्तू पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. आधुनिक जगामध्ये अशाप्रकारच्या गोष्टी करणारे आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवणा-यांचं मला वाईट वाटतं, असं सुधीरन म्हणाले.

पूर्वीच्या काळात केरळमध्ये काळी जादू शिकणं आणि त्याचा वापर करणं सामान्य मानलं जायचं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader sudheeran files fir after hint of black magic

ताज्या बातम्या