"द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती नको, ही तर चमचेगिरीची...", काँग्रेस नेत्याच्या विधानानंतर वाद | Congress Leader Udit Raj Statement over President Murmu creates controversy sgy 87 | Loksatta

‘७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात’ म्हणणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका, म्हणाले “ही तर चमचेगिरीची…”

कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत, महिला आयोगाने काँग्रेस नेत्याला माफी मागण्याचा आदेश

‘७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात’ म्हणणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका, म्हणाले “ही तर चमचेगिरीची…”
महिला आयोगाने काँग्रेस नेत्याला माफी मागण्याचा आदेश

काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत’ असं वक्तव्य उदीत राज यांनी केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या विधानानंतर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उदीत राज यांनी स्पष्टीकरण देताना हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.

उदीत राज यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल”.

उदीत राज यांच्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ‘ही आदिवासी विरोधी मानसिकता’ असल्याची टीका भाजपाने केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

भाजपाची टीका

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे की “उदीत राज यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी वापरलेले शब्द दुर्दैवी असून, चिंता वाढवणारे आहेत. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनीही हे केलं आहे. यावरुन त्यांची आदिवासी विरोधी विचारसरणी समोर येते”.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

भाजपाच्या शेहजाद पुनावाला यांनीदेखील ट्विट केलं आहे. “अजॉय कुमार यांनी मुर्मू यांना पापी म्हटल्यानंतर आणि अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केल्यानंतर काँग्रेसची पातळी आणखी खालावली आहे. उदीत राज यांनी पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह भाषा वारली आहे. काँग्रेसला आदिवासी समाजाचा हा अपमान मान्य आहे का?” अशी विचारणा केली आहे.

उदीत राज यांचं स्पष्टीकरण

दरम्यान उदीत राज यांनी वाद वाढू लागल्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून हे आपलं वैयक्तिक मत असून, पक्षाचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगत सारवासारव केली आहे. ते म्हणाले “द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी आणि प्रचार आदिवीसांच्या नावेच करण्यात आला होता. याचा अर्थ त्या आता आदिवासी नाहीत असा होत नाही. जेव्हा अनुसूचित जाती/जमातीमधील एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करत मूक बनते तेव्हा मला वेदना होतात”.

महिला आयोगाचा माफी मागण्याचा आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाने उदीत राज यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. महिला आयोगाने उदीत राज यांना नोटीस पाठवली असून माफी मागण्यास सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं?

संबंधित बातम्या

Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे
सतत उलट्या होत असल्याने रुग्णालयात जाऊन केली तपासणी, पोटात असं काही सापडलं की डॉक्टरही चक्रावले
Video: सून भाजपाची उमेदवार, पण रवींद्र जाडेजाच्या वडिलांचा काँग्रेससाठी प्रचार; व्हिडीओ व्हायरल!
संतापजनक! ५ विद्यार्थ्यांकडून वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, कृत्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर केला शेअर
विश्लेषण: आणखी एका राज्यात `आपʼचा शिरकाव; हरयाणात थेट दुसऱ्या क्रमांकावर!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘योग्य संधी मिळण्यासाठी संजू सॅमसनने धीर धरावा’, प्रशिक्षक म्हणाले, ” सूर्यकुमार यादवलाही….”
फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
“उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते …”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
आफताबने आधीपासूनच रचला होता श्रद्धाच्या खूनाचा कट? पॉलीग्राफी चाचणीत विचारण्यात आले ‘हे’ सात प्रश्न
Video: भर पार्टीत ‘दिल ले गयी’ गाण्यावर बेभान होऊन नाचली करिश्मा कपूर, उपस्थितही तिच्याकडेच बघत राहिले अन्…