पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खोटे असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी रविवारी केला. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मतदानोत्तर चाचण्यांमध्ये जे अंदाज वर्तवण्यात आले आहेत, त्यापेक्षा पक्ष अधिक चांगले काम करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.

charulata tokas
‘या’ बड्या महिला काँग्रेस नेत्यास थेट मुख्यमंत्र्यांकडूनच विधानसभेची ऑफर…पक्षात घुसमट होत….
maha vikas aghadi agree to share seat for small parties in assembly elections zws 70
विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
Shivsena, claim, Murbad Constituency,
शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
PM Narendra Modi Mocks Rahul Gandhi
नरेंद्र मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, “काँग्रेसकडून पडलेल्या लहान पोराचं मन रमवण्याचा प्रकार..”
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
congress likely to contest at least 84 seats in maharashtra assembly elections
विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता
sanjay raut ravindra waikar
“…तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ दिली जाणार नाही”, संजय राऊतांचं वक्तव्य
congress youth workers to visit every village in bhokar assembly constituency after victory in lok sabha poll
नांदेडमध्ये काँग्रेसची अशीही मोहिम

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विविध राज्यांतील प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी दृकश्राव्य संवाद साधला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनीही काँग्रेस उमेदवारांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. मतमोजणीच्या दिवशी हेराफेरीचे कोणतेही प्रयत्न रोखण्यासाठी सतर्क रहा, असा सल्ला या नेत्यांनी दिला़ मतदानोत्तर चाचण्या बोगस असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीतील हेराफेरीचे समर्थन करण्याचा हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळल्या गेलेल्या मानसिक खेळाचा हा भाग आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.