२०१४ मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो त्याचवेळी आम्हाला काही दिवसात समजले की देशाच्या अर्थव्यवस्थे भू सुरुंग लावण्याचे काम काँग्रेसने केले आहे. यूपीए काळातील सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेतृत्त्वाखालील सरकारला दोषी ठरवले. थकीत कर्जदारांना आपल्या सरकारने १ रूपयाही कर्ज दिले नसल्याचाही दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)चे उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेची अवस्था काय झाली होती याचे आपल्या खास शैलीत वर्णन केले. थकबाकीदारांकडून पै-पै वसूल करण्याचे काम आमचे सरकार करते आहे. यूपीएच्या काळात काही नामदारांना एका फोनवर सहा वर्षांमध्ये लाखो कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले त्यानंतर काही दिवसातच आम्हाला हे समजले की काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेला भू सुरुंग लावला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.