“ड्रग्ज वेदना कमी करतात, दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन वापरायला परवानगी द्यावी”; काँग्रेस खासदाराचे विधान

एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे,” असे काँग्रेसच्या खासदारांनी म्हटले आहे

Congress mp kts tulsi statement approva drugs use with tax
खासदार केटीएस तुलसी (फोटो सौजन्य : ANI)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर देशभरात ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यानंतर यावरून राजकारणही तापले आहे. दरम्यान, देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर अजब विधान केले आहे. दरम्यान, देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी ड्रग्जवर अजब विधान केले आहे. मादक द्रव्ये जीवनावश्यक असून गुटखा, दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन कर भरून केले जात असल्याचे केटीएस तुलसी म्हणाले.

गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी ड्रग्जनाही सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे, असे खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटले आहे. ड्रग्जमुळे आयुष्यातील वेदना कमी होतात, असे सांगताना तुलसी म्हणाले, “दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. मात्र यांच्यावर  कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे.”

“अनेक प्रसंगी ड्रग्जच्या माध्यमातून औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? एनडीपीएस(नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस) कायदा, १९८५ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्याचा वारंवार गैरवापर लोकांना अंमली पदार्थांच्या जास्त किंवा कमी वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे,” असे केटीएस तुलसी म्हणाले.

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार केटीएस तुलसी हे देशातील कायदेतज्ज्ञ खासदार मानले जातात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यादरम्यान तुलसी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बराच वेळ संवाद झाला होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी दुपारी तीन वाजता घेणार असल्याचे सांगितले. दोन दिवस तिन्ही आरोपींच्या वकिलांनी बाजू मांडली होती. एनसीबीचे एएसजी अनिल सिंग युक्तिवादाला उत्तर देणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress mp kts tulsi statement approva drugs use with tax abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या