congress mp rahul gandhi replied on 70 saal remark of pm narendra modi on twitter | Loksatta

“काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं” पंतप्रधानांच्या प्रश्नावर राहुल गांधींचे सडेतोड उत्तर, म्हणाले, ‘आम्ही भारताला…’

भाजपा सरकार देशातील पाच ते सहा श्रीमंत भारतीयांसाठीचे सरकार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा चालू आहे. या यात्रेत काँग्रेस नेत्यांकडून सत्ताधारी भाजपाचे धोरण आणि कार्यशैलीवर वारंवार टीका करण्यात येत आहेत. खासदार राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने विचारला जातो. या प्रश्नाला राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘या ७० वर्षांत आम्ही भारताला कधीही सर्वाधिक बेरोजगारी दिली नाही. आजच्या घडीची विक्रमी भाववाढ आम्ही भारताला कधीच दिली नाही’, असे गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

“दिल्लीएवढ्या जमिनीवर चीनचा…”, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

‘भाजपा सरकार शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी नाही. हे सरकार देशातील पाच ते सहा श्रीमंत भारतीयांसाठीचे सरकार आहे जे लोक भारतातील हव्या त्या व्यवसायात मक्तेदारी करू शकतात’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशातील महागाई आणि बेरोजगारीचा भाजपातील उद्योगपतींना फायदा होत असल्याचा आरोप याआधी गांधी यांनी वारंवार केला आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील युवकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील आघाडी सरकारमुळे भारताच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचे मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर काही तासातच ट्वीट करत राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. देशातील महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस भाजपा सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसने आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Russia-Ukraine War: युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर म्हणाले; “आम्ही प्रामाणिकपणे…”

संबंधित बातम्या

“ब्राह्मणांनो परिसर सोडा आणि शाखेत…”, ‘जेएनयू’मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणांनी भिंती रंगल्या, चौकशी सुरू
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?
Delhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण? आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: युवक काँग्रेसकडून राजभवनसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
आई xx दे की रिप्लाय!
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चाताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
IPL 2023: ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून निवृत्त, सीएसकेसाठी दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत