काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. आज(शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आतापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मात्र दुपारी शशी थरूर हे अर्ज भरणार आहेत. तर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिल्कार्जुन खर्गे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाले आहेत. याशिवाय दिग्विजय सिंह यांनी काल उमेदवारी अर्ज घेतला असून ते आज अर्ज सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीमुळे आता दिग्विजय सिंह हे या शर्यतीतून बाहेर पडण्याची चिन्ह दिसत आहेत. आज सकाळीच दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. दरम्यान, G-23 गटातून वेगळा उमेदवार उभा करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मनीष तिवारी यांनी यापूर्वीच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आज सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत कोणताही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. अशी माहिती काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष, एम मिस्त्री यांनी दिली आहे.

शशी थरुर यांनी काल प्रतिस्पर्धी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीचा फोटो थरुर यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. “ही शत्रूंमधील लढाई नाही, तर सहकाऱ्यांमधील मित्रत्वाची स्पर्धा आहे”, असे कॅप्शन थरुर यांनी या फोटोला दिले आहे. काँग्रेसचा विजय हेच दोघांचे लक्ष्य असल्याचे थरुर म्हणाले आहेत.

१७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार –

काँग्रसेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख १ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९ हजारांहून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी मतदान करती

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president election as mallikarjun kharges name comes forward digvijay singh on the backfoot msr
First published on: 30-09-2022 at 11:13 IST