"हा SP कोण आहे?," अशोक गहलोत यांच्या सोनिया गांधी भेटीमधील 'तो' कागद लीक, चर्चांना उधाण | Congress President Election Ashok Gehlot note while meeting Sonia Gandhi is leaked mentioning SP will leave party sgy 87 | Loksatta

“हा SP कोण आहे?,” अशोक गहलोत यांच्या सोनिया गांधी भेटीमधील ‘तो’ कागद लीक, चर्चांना उधाण

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान सोबत ठेवलेल्या काही नोंदी लीक

“हा SP कोण आहे?,” अशोक गहलोत यांच्या सोनिया गांधी भेटीमधील ‘तो’ कागद लीक, चर्चांना उधाण
अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान सोबत ठेवलेल्या काही नोंदी लीक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान कागदावर लिहिलेल्या नोंदी लीक झाल्या आहेत. अशोक गहलोत यांनी हातात ठेवलेल्या कागदाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चांना उधाण आलं आहे. अशोक गहलोत यांनी राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय गोंधळासाठी सोनिया गांधींची माफी मागितली असून, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनही माघार घेतली आहे.

खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

या कागदावर ‘एसपी पक्ष सोडतील’ असा उल्लेख असल्याचं दिसून येत आहे. यावरुन भाजपाने शंका उपस्थित केली असून ‘हे एसपी कोण आहेत?’ अशी विचारणा केली आहे. Malayala Manorama च्या फोटोग्राफरने काढलेल्या फोटोत हा कागद आणि त्यावरील मुद्दे कैद झाले आहेत. यावरुन अशोक गहलोत आपली बाजू मांडण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते असं दिसत आहे.

या कागदावर काय लिहिलं होतं?

१) एसपी पक्ष सोडतील, पक्षाच्या निरीक्षकांनी आधी अहवाल दिला असता तर ते पक्षासाठी जास्त योग्य ठरलं असतं.

२) पहिले प्रदेशाध्यक्ष ज्यांनी सरकार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला

३) १०२ विरुद्ध SP + १८

४) जे झालं ते फार खेदजनक आहे, मलादेखील त्यामुळे वाईट वाटत आहे.

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी या कागदाचा फोटो ट्विटरला शेअर केला असून “अशोक गहलोत यांनी नोंद केली आहे तो SP कोण आहे?” अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांना जाणुनबुजून कागद दाखवला का? अशी शंकाही व्यक्त केली आहे. तसंच काँग्रेस जोडा, भारत एकत्र आहे असाही अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला टोला लगावला आहे.

अशोक गहलोत यांचे समर्थक अनेकदा सचिन पायलट हे पहिले प्रदेशाध्यक्ष असतील ज्यांनी सरकार पाडण्याचा कट आखला असल्याचा उल्लेख करत असतात. २०२० मध्ये सचिन पायलट यांनी बंड पुकारलं होतं, तेव्हा १०२ आमदार गहलोत यांच्यासह होते. तर सचिन पायलट यांनी १८ आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला होता. सचिन पायलट भाजपाच्या मदतीने सरकार पाडत असल्याचा आरोप त्यावेळी कऱण्यात आली होता.

अशोक गहलोत यांनी गुरुवारी आपण काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटाची सर्व नैतिक जबाबदारी घेत त्यांनी ही घोषणा केली. सोनिया गांधींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
PM Modi 5G Inauguration : नरेंद्र मोदींना स्वत: मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी दिलं 5G सेवेचं प्रात्याक्षिक!

संबंधित बातम्या

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज
डेटिंग अॅपवरील बॉयफ्रेंडला भेटायला 5 हजार किमीचा प्रवास; अवयवांच्या विक्रीसाठी त्यानं केली तिची हत्या
Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताब पूनावालाने एक, दोन नव्हे तर…; तपासात धक्कादायक खुलासा
“गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले?” म्हणणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कामाख्या देवी कडक…”
26/11 Mumbai Terror Attack: आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग, इराण ते मुंबई व्हाया…!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”
पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर