काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी शनिवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. उदयपूरमध्ये झालेल्या ‘एक नेता, एक पद’ ठरावाचं पालन करत खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. खरगे यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांची नावं चर्चेत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे, तसंच ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही खरगे यांच्या नावाला पसंती दिली असल्याने तेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
Dhule Lok Sabha Constituency, dhule Congress Internal Rift, Candidate Selection, District President Resigns, Protest, dr shobha bachhav, dr. tushar shewale, bjp, congress, malegaon,
धुळ्यात उमेदवार लादल्याचा काँग्रेसवर आरोप – जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?

खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले.

‘जी-२३’ नेते ऐन वेळी खरगेंच्या मागे

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर शुक्रवारी वाजतगाजत पक्षाच्या मुख्यालयात आले; पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. बंडखोर नेते ‘तटस्थ’ राहिलेल्या सोनिया गांधींचे उमेदवार खरगे यांच्या शेजारी उभे होते.