काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शशी थरुर यांच्यासमोर पक्षाचे अनुभवी नेते मल्लिकार्जून खर्गे यांचं आव्हान असणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शशी थरुर यांनी पक्षासाठी आपली काय धोरणं असतील हे स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आपण पक्षातील हायकमांड संस्कृतीमध्ये बदल करु असं स्पष्ट सांगितलं. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी थरुर यांनी यावेळी प्रत्येक गोष्ट दिल्लीतील नेतृत्वाकडे ढकलण्याची पद्धत योग्य नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष ठरवतील हे एकच वाक्य सांगणारी व्यक्ती पक्षात नको.

पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पक्षांतर्गत निवडणूक आणि स्थिर नेतृत्वाची मागणी करणाऱ्या जी-२३ नेत्यांमध्ये शशी थरुर यांचाही समावेश होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा सर्वात प्रथम शशी थरुर यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती.

Congress President Election: शशी थरुर यांना जी-२३ नेत्यांचा विरोध? थरुर म्हणाले, “मी या निवडणुकीत…”

मल्लिकार्जून खर्गे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबाचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना शशी थरुर यांनी आपण नवा दृष्टीकोन देऊ असं सांगितलं. मल्लिकार्जून खर्गे यांनी जी-२३ मधील नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, शशी थरुर यांनी आपल्या मनात खर्गेंच्या विरोधात कोणतीही भावना नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी काँग्रेसचे भीष्म पितामह असा त्यांचा उल्लेख करत, आपण शत्रू नव्हे तर सहकारी असल्याचं स्पष्ट केलं.

शशी थरुर यांनी आपण तिन्ही गांधींची भेट घेतली असून त्यांनी या निवडणुकीमुळे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला असल्याचंही सांगितलं आहे.

पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करणं, नेतृत्वाला नव्याने आकार देणं, मूळ विचारसरणी पुनर्जिवित करणं, तरुणांवर लक्ष केंद्रित करणं आणि सामाजिक कार्याच्या राजकारणात परतणं हेच आपलं ध्येय असल्याचं थरुर म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president election shashi tharoor on high command culture gandhi family sgy
First published on: 30-09-2022 at 16:47 IST