नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सध्या देशभर चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरलं आहे काँग्रेसनं ठिकठिकाणी सुरू केलेलं आंदोलन. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर आज त्या चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून देशभरात निषेध आंदोलनं केली जात आहेत. मुंबईतल्या ईडी कार्यालयासमोर देखील काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप आणि इतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. सोनिया गांधींची चौकशी आणि त्यापाठोपाठ काँग्रेसचं देशभरातील आंदोलन या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यश्र नाना पटोले यांनी सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे.

सोनिया गांधींचा हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सोनिया गांधींनी केलेलं विधान काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून, तसेच काँग्रेसच्या मित्रपक्षांकडून देखील व्हायरल केलं जात आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नसली, तरी आजच्या ईडीच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

What Priyanka Gandhi Said?
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर
HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
Robert vadra and rahul gandhi for amethi
अमेठी लोकसभेसाठी गांधी कुटुंबाचे जावई रॉबर्ट वाड्रा इच्छूक, म्हणाले, ‘स्मृती इराणींना लोक कंटाळले’

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचा संदर्भ देत एका प्रश्नाला उत्तर दिलं आहे. “मी इंदिरा गांधींची सून आहे आणि कुणालाही घाबरत नाही”, असं सोनिया गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना नाना पटोले यांनी #सत्यसाहससोनिया गांधी असा हॅशटॅग देखील दिला आहे.

“मोदीजी, तुम्हाला माहितीये ना की सोनिया गांधी…”

दरम्यान, काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या जनअधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी देखील सोनिय गांधींच्या ईडी चौकशीसंदर्भात ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधींना घाबरवू शकला नाहीत. मोदीजी, तुम्हाला माहितीये ना, की सोनिया गांधी त्यांच्या आई आहेत?” असा खोचक सवाल पप्पू यादव यांनी केला आहे.

सोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.