scorecardresearch

Congress Presidential Election: काही काँग्रेस नेत्यांकडून मला रोखण्याचा प्रयत्न, राहुल गांधींनी…; शशी थरुर यांचा गौप्यस्फोट

आपण निवडणूक लढवावी अशी राहुल गांधींची इच्छा, शशी थरुर यांचा दावा

Congress Presidential Election: काही काँग्रेस नेत्यांकडून मला रोखण्याचा प्रयत्न, राहुल गांधींनी…; शशी थरुर यांचा गौप्यस्फोट
आपण निवडणूक लढवावी अशी राहुल गांधींची इच्छा, शशी थरुर यांचा दावा

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत खासदार शशी थरुर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, शशी थरुर यांनी पक्षातील काही नेते आपल्याला निवडणूक लढण्यापासून रोखू इच्छित आहेत. यासाठी त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली होती असा गौप्यस्फोट केला आहे. पण राहुल गांधी यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

शशी थरुर यांनी सांगितलं की “नुकतीच आपण राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला पक्षातील काही नेते थरुर यांना अर्ज मागे घेण्यास सांगा असी मागणी करत असल्याची माहिती दिली. पण राहुल गांधी यांनी नकार दिला”. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची मागणी अमान्य केली असा शशी थरुर यांचा दावा आहे.

Congress President Election: अर्ज दाखल करताच शशी थरुर यांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसमधील हायकमांड संस्कृती…”

आपण निवडणूक लढवावी अशी राहुल गांधींची इच्छा असल्याचं शशी थरुर यांनी सांगितलं आहे. यामुळे पक्षाला फायदा होईल असं राहुल गांधींचं म्हणणं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; शशी थरूर यांची अपेक्षा

काँग्रेस पक्षात अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हायला हवे, अशी अपेक्षा शशी थरूर यांनी शनिवारी नागपूरमध्ये व्यक्त केली. “ही निवडणूक युद्ध नसून मैत्रीपूर्ण लढत आहे. लोक म्हणतात माझ्यासाठी निवडणूक कठीण आहे. परंतु मी कधीही अडचणींना बघून पळालो नाही. बऱ्याच सामान्य कार्यकर्त्यांनी मला निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला. मी त्यांचा आवाज बनू इच्छितो. १७ तारखेला निवडणूक होईल. मला चांगली मते मिळण्याचा विश्वास आहे. जर कुणी मोठा नेता निवडणूक लढल्यास स्वाभाविकच नेते त्यांच्या बाजूने उभे राहतात. परंतु माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षात सकारात्मक बदल हवा आहे. आता युवा नेत्यांना ऐेकण्याची वेळ आहे. कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. ही निवडणूक गोपनीय मतपत्रिकेवर होणार आहे. मोठा नेता असो किंवा कार्यकर्ते सगळ्यांचे एकच मत मोजले जाते. त्यामुळे मला जिंकण्याचा विश्वास असल्याचं,” थरूर म्हणाले.

Congress President Election: शशी थरुर यांना जी-२३ नेत्यांचा विरोध? थरुर म्हणाले, “मी या निवडणुकीत…”

‘जी-२३’ गटातील नेतेही पाठीशी असल्याचा खरगेंचा दावा

काँग्रेसमध्ये ‘जी-२३’ नावाचा कोणताही बंडखोर गट राहिलेला नाही. माझा उमेदवारी अर्ज भरताना बंडखोर गटातील नेतेही उपस्थित होते. मी कोणाला विरोध करण्यासाठी नव्हे तर, काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. मी सगळय़ांना बरोबर घेऊन संघ आणि भाजपविरोधात संघर्ष करेन, असं उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या