काँग्रेसचा प्रत्येक व्यक्ती संविधानासाठी आणि जुलूमशाहीविरोधात लढणार – प्रियंका गांधी

“देशातील तरुण भारताचा आत्मा असून, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला आहे”

देशातील तरुण भारताचा आत्मा असून, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला आहे अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन केलं. जवळपास दोन तास आंदोलन केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली.

“सरकारच्या कृतीमुळे संविधानाला धक्का बसला आहे. तरुण देशाचा आत्मा असून, हा देशाच्या आत्म्यावर करण्यात आलेला हल्ला आहे. निदर्शन करणं त्यांचा हक्क आहे. मीदेखील एक आई आहे. तुम्ही ग्रंथालयात प्रवेश करुन त्यांना बाहेर ओढून काढलंत आणि मारहाण केली. ही जुलूमशाही आहे,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

“काँग्रेसमधील प्रत्येक व्यक्ती या जुलूमशाहीविरोधात लढणार असून, विद्यार्थ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे,” असंही प्रियंका गांधी यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “विद्यापीठात रविवारी काय झालं याचं उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. कोणत्या सरकारने विद्यार्थ्यांना मारहाण केली ? ढासळत्या अर्थव्यवस्थेवर ते बोलले पाहिजेत. त्यांच्या पक्षाच्या आमदाराने तरुणीवर बलात्कार केला आहे. यावर त्यांनी मौन का बाळगलं आहे ?,” असे अनेक सवाल प्रियंका गांधींनी विचारले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress priyanka gandhi vadra amended citizenship law india gate central government delhi clash sgy 87

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका