भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. त्याआधी त्यांनी अमेरिका आणि इतर काही देशांच्या राज्यांच्या आणि कंपन्यांच्या प्रमुखांनाही भेट घेतली आहे. मात्र आता नरेंद्र मोदींच्या या भेटीवरून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. कोविड संसर्ग टाळण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी भारतात तयार केलेल्या कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अद्याप ही लसीला पूर्णपणे मान्यता दिलेली नाही. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील त्याला मान्यता दिलेली नाही.

यामुळे, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही हजारो भारतीय परदेशात जाऊ शकत नाही आहेत. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची परवानगी कशी मिळाली याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिनचा दुसरा डोस एप्रिल महिन्यात मोदींनी घेतला. पंतप्रधानांनी घेतलेल्या करोना लसीला अमेरिकेत मान्यता नसल्यामुळे लोक त्यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारत आहेत.

Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!
Kamal Hasan contesting Lok Sabha elections
कमल हसन ‘या’ जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, द्रमुकने दिली ऑफर

त्यानंतर प्रसिद्ध रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडॉलचे निर्माता निखिल अल्वा यांनी ट्विट करून नरेंद्र मोदींनी कोणती लस घेतली असे विचारले होते. त्यानंतर सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस मिळाल्यानंतरही अमेरिकेत प्रवेश मिळण्याबाबत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिग्विजय सिंह म्हणाले की अमेरिकेने ही लस आपल्या यादीत समाविष्ट केलेली नाही. अशा परिस्थितीत, ही लस मिळाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रवेश कसा मिळाला? असा सवाल त्यांनी केला आहे.

“जर मला आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस घेतली, जी अमेरिकेने मंजूर केलेली नाही. किंवा त्यांनी या व्यतिरिक्त इतर कोणतीही लस घेतली आहे की अमेरिकन प्रशासनाने त्याला सूट दिली आहे? देशाला हे जाणून घ्यायचे आहे,” असे दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीट म्हटले आहे.

दिग्विजय सिंह व्यतिरिक्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचा मुलगा निखिल अल्वा यांनीही यावर प्रश्न विचारला आहे. त्यानी स्वतः ही कोवॅक्सिन लस स्वतः घेतली आहे. “माझ्या पंतप्रधानांप्रमाणे मलाही आत्मनिर्भर कोवॅक्सिन मिळाले आहे. आता मी इराण, नेपाळ आणि इतर काही देश वगळता जगाच्या बऱ्याच भागात प्रवास करू शकत नाही. पण मला हे जाणून आश्चर्य वाटले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळाली आहे, जो कोवॅक्सिनला मान्यता देत नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की त्यांनी प्रत्यक्षात कोणती लस घेतली?”, असे निखिल अल्वा यांनी म्हटले आहे.