राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "मी दिल्लीला..." | Congress Sachin Pilot on political crisis in Rajasthan CM Ashok Gehlot sgy 87 | Loksatta

राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”

सचिन पायलट मुख्यमंत्री नको, गेहलोत समर्थक आमदारांची मागणी

राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”
सचिन पायलट मुख्यमंत्री नको, गेहलोत समर्थक आमदारांची मागणी

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात अकडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना, सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा मात्र याला विरोध असून ८२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या सत्तासंघर्षावर तोडगा काढण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु असताना सचिन पायलट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन पायलट यांनी आपण जयपूरमध्ये असून, दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हायकमांडच निर्णय घेईल असंही सांगितलं आहे. ते म्हणाले “मी जयपूरमध्ये असून सध्या तरी दिल्लीला जाणार नाही. हायकमांडला त्यांचा निर्णय घेऊ दे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन”.

राजस्थानमध्ये ९० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर अशोक गेहलोतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता तर…”

राजस्थानमधील राजकीय स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जून खर्गे आणि अजय माकन यांना पाठवलं असून, सविस्तर अहवाल देण्यास सांगतिलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना अशोक गेहलोत यांचा पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जून खर्गे यांचं म्हणणं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

अजय माकन संतापले

दरम्यान, आमदारांशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी जाहीर केली आहे. ते म्हणाले “प्राथमिकदृष्ट्या ही अनुशासनहीनता सुरु आहे. आम्ही बैठक बोलावलेली असताना त्याच वेळी आणखी एक बैठक बोलावण्यात आली. ते सर्व आमदार आहेत. कोणी राजीनामा दिला आहे हे त्यांनाच माहिती नाही. काँग्रेस अध्यक्ष यावर निर्णय घेतील. त्यांनी काही मागण्या ठेवल्या असून आम्ही त्या मान्य करणार नाही. आम्ही आमदारांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत. आता आम्ही आमचा अहवाल नेतृत्वाकडे सादर करु”.

भाजपाकडून टीका

भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं असून ‘भारत जोडो’ यात्रेमुळे कमी मनोरंजन झाल्याने आता राजस्थानमध्ये सुरु झाल्याचा टोला लगावला आहे. या संघर्षातून काँग्रेसमध्ये फक्त सत्तेची हाव असून, जनतेची सेवा करण्याची इच्छा नाही हे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसकडे ना दिशा आहे, ना नेता असंही ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रस्त्यांवर हजारो मोकाट गायी, ५०० कोटी अन् ‘भाजपाला मतदान करणार नाही’; गुजरातमध्ये गोमातेमुळे CM, BJP अडचणीत

संबंधित बातम्या

“हातावर हात ठेऊन शांत बसणार नाही”, नोटाबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट म्हणाले…
विवेक अग्निहोत्रीने मागितली विनाअट माफी, मात्र, दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, “एवढं पुरेसं नाही, तर…”
“आमच्या वेदनांचा तुम्हाला फायदा होत असेल तर…”; रशियाकडील स्वस्त तेल खरेदीवरुन युक्रेनचा भारताला टोला
शिवसेनेतील बंडखोरीच्या सर्व याचिकांवर सुनावणी होणार, तारीख सांगत सरन्यायाधीश म्हणाले, “घटनापीठात…”
Moose Wala Murder: “मला जिवंत पकडणं तुम्हाला शक्य नाही,” मास्टरमाइंड गोल्डी ब्रारचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
कर्नाटकने डिवचले तरीही, जतमधील राजकारणी श्रेयवादात दंग
राज्यात पाच हजार बायोगॅस संयंत्रे उभारणार; केंद्राच्या योजनेचा कोल्हापूर, पुणे, नगरला सर्वाधिक लाभ
India Bangladesh ODI Series: भारताला विजय अनिवार्य!
रेशीम उद्योगातून उन्नतीचा ‘धागा’!; अमरावतीत विदर्भातील पहिला रेशीम बाजार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला!