Suryabanshi Suraj: ओडिशासह देशभरात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण नाचताना दिसतोय. त्याच्या शेजारी मद्याच्या बाटल्या देखील दिसत आहेत. ही व्यक्ती ओडिशा सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री सूरज सूर्यवंशी असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसच्या डिजीटल विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की हे सूरज सूर्यवंशी आहेत. हे भाजपाच्या ओडिशा सरकारमध्ये मंत्री आहेत. सूर्यवंशी हे ओडिशा सरकारमध्ये उच्च शिक्षण, युवा आणि क्रिडा मंत्री आहेत. तसेच ते ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती कार्यमंत्री देखील आहेत. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती सूरज सूर्यवंशी यांच्यासारखी दिसत असली तरी त्याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

सुप्रिया श्रीनेत आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सूरज सूर्यवंशी हे ओडिशात नव्याने स्थापन झालेल्या मोहन चरण माझी सरकार सरकारमधील मंत्री आहेत. ते राज्यातले सर्वात तरुण मंत्री असून त्यांचं वय केवळ २८ वर्षे इतकं आहे. भाजपा नेते मोहन चरण माझी यांनी १२ जून रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून तर सूरज सूर्यवंशी यांच्यासह कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. माझी यांच्या कॅबिनेटमध्ये सूरज सूर्यवंशी यांना उच्च शिक्षण, क्रीडा, युवा कल्याण, ओडिया भाषा, साहित्य आणि संस्कृती विभाग सोपवण्यात आला आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
eknath shinde sanjay raut (1)
“शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?” राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर संताप; म्हणाले, “वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये”
Rahul gandhi
राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Saurabh Netravalkar Exclusive Interview
“मला रंगांधळा म्हणत त्यांनी..”, सौरभ नेत्रावळकरने सांगितला भारत सोडण्याआधीचा किस्सा; म्हणाला, “दोन वर्षं मागितली..”

हे ही वाचा >> “शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?” राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर संताप; म्हणाले, “वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये”

दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. अनेक युजर्स सूर्यवंशी यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. तर काहीजण सूर्यवंशी यांचा बचाव देखील करत आहेत. अनेकांनी म्हटलं आहेकी, मद्य प्राशन करणं किंवा न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एका युजरने माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राजीव गांधी आणि मद्याची बाटली दिसत आहे. या फोटोच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही. दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की, हा माणूस शिक्षणमंत्री बनण्याच्या लायकीचा नाही. ओडिशा सरकारने त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे. तर, आणखी एका युजरने थेट सुप्रिया श्रीनेत यांच्यावरच टीका केली आहे. त्याने म्हटलं आहे की, तुम्हाला यात अडचण काय आहे? एखादी व्यक्ती मद्यप्राशन करत असेल, त्या क्षणाचा आनंद घेत असेल तर तुमचा त्यावर आक्षेप असण्याचं कारण काय?